नमस्कार मंडळी, मी मंगेश गोळे, मागील काही वर्षांपासून ब्लॉगिंग क्षेत्रात काम करत आहे. About us या ब्लॉगिंग क्षेत्रात वेगवेगळ्या विषयांवर काम केल्यानंतर मी असे पाहिले की आपल्यापैकी बरेचसे असे तरुण आहेत ज्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर किंवा काहींना शिक्षण पूर्ण न करता नोकरी करण्याची गरज पडते. अशा वेळेस आपण आपले नातेवाईक किंवा मित्रमंडळी यांना नोकरी पाहण्यासाठी सांगतो.
बऱ्याच वेळेला या नोकरी खाजगी असतात किंवा प्लेसमेंट च्या असतात तेथे पैसे द्यावे लागतात. आणि मग आपण तेथे पैसे न दिल्यामुळे आपली निवड होत नाही. मग आपण काही छोटे-मोठी सरकारी नोकरी मिळते का याचा प्रयत्न करतो. परंतु नोकरीचे नवनवीन अपडेट आपल्याला मिळायला त्रास होतो.
यासाठीच आम्ही नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या आपल्या मराठमोळ्या नोकरी पोर्टलवर नवनवीन नोकरीचे अपडेट देण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला आवडत असेल तर आपले मित्र परिवार आणि नातेवाईक यांना नक्की शेअर करायला विसरू नका.
तसेच या संबंधित तुमच्या काही अडचणी असेल किंवा तक्रारी असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क सुद्धा करू शकता. त्यासाठी आमच्या वेबसाईटवर असलेल्या ग्रुपला तुम्ही जॉईन करा आणि एडमिनला मेसेज करा.
हे महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली तर, पुढे शेअर करायला विसरू नका. कारण कदाचित आपण शेअर केल्यामुळे आपल्या एखाद्या मित्राला-भावाला-बहिणीला जॉब मिळू शकतो.
🔴 महत्त्वाची सूचना
ही कोणतीही सरकारी वेबसाईट नाही. ही एका व्यक्तीने चालू केलेले आपल्या मदतीसाठी असलेले नोकरी पोर्टल आहे. यावर दररोज नवनवीन नोकरीचे अपडेट दिले जातात. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास, संबंधित सरकारी वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या आणि त्या संबंधी माहिती काळजीपूर्वक वाचा.
तुम्ही कोणत्याही प्रकारच्या भरतीसाठी अर्ज करताना, कोणालाही कुठेही पैसे देण्याची गरज नाही. कोणत्याही खोट्या बातमीवर विश्वास ठेवू नका.
धन्यवाद..!
(टीम – नोकरी हक्काची)